परंडा (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा महाविद्यालय धाराशिव येथे दि. 2 फेब्रूवारी  रोजी  कै.बाजीराव पाटील आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालयाची बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी  कु.प्रतीक्षा शिवाजी लिमकर हिने या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन अभ्यासपूर्ण विचार मांडले आणि वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. तर शुभम फरतडे बीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी याने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सदर स्पर्धा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाच्या अंतर्गत आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सदर  विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते बुके देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा. डॉ. विद्याधर नलवडे, प्रा. डॉ. अक्षय घुमरे, प्रा. रणजीत वरपे, प्रा. संभाजी धनवे, प्रा. अंकुश शंकर, कार्यालयीन कर्मचारी सुभाष शिंदे, श्रीमती पद्मा शिंदे, पालक शिवाजी लिमकर आदी उपस्थित होते. कार्यालयीन वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षिरसागर यांना सहारा चारिटेबल ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेने प्रशासकीय कामात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी बुके देऊन सत्कार केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने व महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापकांनी अभिनंदन व कौतुक केले.


 
Top