परंडा (प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्यासाठी येणाऱ्या कालावधीत व्यापक चळवळ उभी करुन दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी शासनदरबारी लढा उभा उभा करणार असल्याचे मत राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके यांनी व्यक्त केले. प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव व महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरगम मंगल कार्यालयात सोमवार ता.5 रोजी दिव्यांगासाठी स्वंय रोजगार मेळावा घेण्यात आला.यावेळी डोके बोलत होते.

कार्यक्रमास प्रहार दिव्यांग क्रांती अंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे ,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,बस आगारप्रमुख उल्लास शिनगारे, बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील, महेश माळी, नसीर शहाबर्फीवाले, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, राष्ट्रवादीचे नंदु शिंदे,  खय्यूम तुटके, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डोके म्हणाले की,दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी बीजभांडवलाचे कर्ज लवकरच उपलब्ध करुन देणार आहे.दिव्यांगाच्या वेळोवेळी अडीअडचणी समस्यावर उठाव करुन दिव्यांगाच्या न्यायहक्कासाठी लढा देत आहोत.दिव्यांग आधिनियम 2016 च्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे गृहमंञी व मुख्यमंञी यांची भेट घेऊन अडचणी सांगणार आहे.

प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे म्हणाले की, दिव्यांगाच्या अनेक योजनांना शासनाने मंजुरी दिली आहे.“उमेद“ अंतर्गत बचतगटांना कर्ज पुरवठा करणार आहोत.शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत नाहीत. दिव्यांग व्यक्तीला कोणी हिणवले तर संबधितावर अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल होवु शकतो. यावेळी राहुल बनसोडे,पांडुरंग चोबे,महेश माळी यांनी मनोगत व्यक्त केले.या मेळाव्यात विविध क्षेञात कार्यरत दिव्यांगाचा सत्कार गौरव करण्यात आला.या दिव्यांग मेळाव्यास तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग व्यक्ती,महिलांची उपस्थिती होती.या मेळाव्यासाठी अमोल शेळके, पांडुरंग मिसाळ, घनश्याम शिंदे, रियाज पठाण, पांडुरंग चौबे, सलामत शेख, शैला पोतदार, इकबाल बेसकर, दादा गवारे, जीवन तीपाले आदिसह दिव्यांग संघटनेने पुढाकार घेतला होता. 
Top