धाराशिव (प्रतिनिधी)- ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. गेल्या दोन दिवसात धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, औसा, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा व बार्शी या तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक धाराशिव लोकसभा समन्वयक स्वप्निल कुंजीर व सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा संवाद दौरा संपन्न झाला.

तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. 

उमरगा तालुक्यातील मुरूम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उमरगा युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व महिलांना शिलाई मिशीन वाटप या कार्यक्रमास उपस्थीत राहून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. औसा ता. लातुर येथे सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख दिनकर माने, तालुकाप्रमुख आबासाहेब पवार, आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे संपर्क कार्यालय धाराशिव येथे धाराशिव तालुका व शहराची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना येणा-या निवडणुकीत कशा पदधातीनी सामोरे जायचे या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समिती ता कळंब येथे जिल्हा संघटक दिलीप पाटील,तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. भुम येथे तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर यांच्या निवास्थानी बैठक संपन्न झाली. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमूख जिनत सय्यद आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. परंडा येथे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवास्थानी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील जिल्हाप्रमुख रणजित पाटील, परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील आदी उपस्थित होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे संपर्क कार्यालय बार्शी येथे बार्शी तालुक्याची बैठक संपन्न झाली या बैठकीस  तालुकाप्रमूख  प्रवीण काकडे ,शहर प्रमुख दिनेश नाळे आदी उपस्थित होते. 
Top