धाराशिव (प्रतिनिधी)-मराठी भाषा समृद्ध इतिहासाने नोंदवली गेलेली आहे. अभिजात भाषेची क्षमता मराठी भाषेत असून लवकरच तिला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त होईल. ते पुढे म्हणाले की,शब्दांचे अर्थ समजून घेतले तर भाषेची गोडी वाढते. त्यामुळे शब्दांचा अर्थ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे श्री रवींद्र केसकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उदगार काढले.

धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी मराठी विभागाच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित गुलमोहर भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. जीवनरावजी गोरे, तर प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि डॉ. रमेशजी दापके हे होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले प्रस्ताविक डॉ. रमेश दापके यांनी केले तर आभार प्रा.डॉ. शिवाजी गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सुरेखा जगदाळे, तबसुम पठाण तसेच मराठी विभागातील प्रा. राजा जगताप, डॉ. वैशाली बोबडे आणि प्रा.सुवर्णा गेंगजे व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top