धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले  हायस्कूलमध्ये राज्य शासनाच्या वतीने 27 फेब्रुवारी हा दिन मराठी भाषा गौरव दिन -कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात आला.

 याचे औचित्य साधून प्रशालेमध्ये संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा संस्थासदस्य आदित्य पाटील, विस्तार अधिकारी काझी, उपप्राचार्य एस. के. घार्गे, उप मुख्याध्यापक  सिद्धेश्वर कोळी, पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक एन.एन. गोरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी कलाध्यापक शिवाजी भोसले, किरण गरड, डुरे पाटील, एन. एस. मुळे व सर्व मराठी अध्यापक, अध्यापिका उपस्थित होते.


 
Top