कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील अनेक रेशनकार्ड धारक आँनलाईन  प्रक्रियेपासून वंचित आहेत त्यामुळे त्यांची शिधापत्रिका शोध मोहीम राबवून  तात्काळ ऑनलाईन करून देण्याची मागणी मानव अधिकार आंदोलन च्या वतीने कळंब तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कळंब  तालुक्यामध्ये अनेक रेशनकार्ड धारक हे भुमिहिन, शेतकरी, दिव्यांग आहेत या लाभधारकांना रेशन कार्ड आहेत. परंतु अनेकांच्या रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांचा त्यामध्ये समावेश दिसून येत नाही. त्यामुळे सदरील रेशन कार्डधारकांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तर आयुष्यमान भारत हे कार्ड आरोग्याच्या विमा योजनेसाठी काढत असताना ऑनलाईन नावे नसल्यामुळे ते निघत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कळंब तालुक्यातील आनेक गावातील हे लाभधारक अन्नधान्य व आरोग्याच्या विमा योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे त्यांची आपल्या कार्यालयाच्या वतीने शोध मोहीम राबवून त्यांना अन्नधान्य व आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशनकार्ड आँनलाईन करुन द्यावे अशी मागणी मानव अधिकार आंदोलन च्या वतीने करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर मानव अधिकार आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांची स्वाक्षरी आहे.


 
Top