परंडा (प्रतिनिधी) - शहरात वास्तव्यास असणाऱ्या  शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्या प्रमाणे शासकीय विविध योजनांचे लाभ देण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार सामाजीक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

सोमवार दि.12फेब्रुवारी रोजी परंडा  तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या वतीने   विविध मागण्याचे निवेदन दिले आहे.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा शहरात रहिवाशी असलेले परंतु पुर्ण शेतीवर अवलंबुन असलेले अनेक शेतकरी यांना शेतीशी निगडीत केंद्र व राज्य शासणाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येत नसल्याने शहरात वास्तव्य करणारे शेतकरी शासकीय लाभा पासुन वंचित राहत आहेत.

शहरातील शेतकरी व शेतमजुर यांना कोणत्याही प्रकारचे जॉब कार्ड प्राप्त झालेले नसुन जॉब कार्ड नसल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रच ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये शहरातील शेतक-यांना व शेतमजुरांना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या शेतकरी म्हणुन जे लाभ व योजना शेतीशी निगडीत लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शहरात वास्तव्यास असलेले शेतकरी व शेतमजुर यांना महत्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत असलेले विविध योजना उदा.गायगोठा,विहीर,तुतीलागवड,शेळीपालन, शेततळे,शेती औजारे तसेच फळबाग योजना व इतर विविध शेती निगडीत योजनांचा लाभ देण्यात यावा आशी मागणी करण्यात आली.

परंडा शहरातील वास्तव्यास असलेल्या सर्व शेतकरी व शेतमजुरांना शासनाच्या सर्व ग्रामीण योजना तात्काळ लागु करण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार परंडा गटाच्या वतीने तिव्र  आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष नसीर शहा बर्फिवाले, माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, डॉ.नवनाथ वाघमोडे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओहाळ, गनी हावरे, नंदु शिंदे, खय्युंम तुटके, इरफान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top