धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या पंचवीस वर्षापासून मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सध्या 7 टीएमसीचे काम जोरात सुरू असून, येत्या पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातील पाणी धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहे. जिल्ह्याला 21 टीएमसी नाही तर आता 23.66 टीएमसी पाणी मिळणार आहे. हा सप्रकल्प कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोमवार दि. 12 फरवरी रोजी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगली, कोल्हापूर येथील पुराचे वाया जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी 15 हजार कोटीचा सहप्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. जागतिक बँकेची टीम 14 तारखेला या प्रारूप आराखड्याच्या पाहणीसाठी येणार आहे. या योजनेस जागतिक बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. धाराशिव जिल्हा हा अकांक्षित जिल्हा असून, जिल्हा पठारावर असल्यामुळे मुबलक पाणी शेतीला मिळत नाही. सांगली, कोल्हापूर येथे पुरामुळे होणारे नुकसान थांबून ते पाणी धाराशिव जिल्ह्याकडे वळविण्यास धाराशिव जिल्ह्यातील अर्थकरणाला चालना मिळेल असे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी लोकसभा संयोजक नितीन काळे, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, राहुल पाटील आदी उपस्थित होते. 


 
Top