भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील बावी येथील रहिवासी बापू रावसाहेब कांबळे वय वर्ष 65 यांनी रोजच्या सावकाराच्या व्याजाला कंटाळून राहत्या घरी लोखंडी बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

सावकाराचे कर्ज वेळेत परत करू न शकल्याने सावकाराने त्यांना मारहाण केली होती. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईक सांगत आहेत. कांबळे यांनी खिश्यात चिट्टी लिहून गळफास घेतला आहे. या चिट्टी मध्ये 5 ते 6 सावकारांची नावे आहेत. बापू कांबळे स्वतःची 10 एकर जमीनन सावकाराच्या कर्जपोटी विकून टाकली आहे. घरी कसलाही व्यवसाय नसल्याने कांबळे यांची दोन मुले स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे येथे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. बापू कांबळे हे बावी येथेच राहत्या घरी असतात. मंगळवारी रात्री सावकाराने बापू कांबळे यांना हानमार केल्यामुळे  बापू कांबळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यत्रा संपवली. बापू कांबळे यांचा मृतदेह कांबळे यांच्या मुलांनी  ताब्यात घेण्यास्‌‍ नकार दिला असून त्यांच्या मारेकर यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत त्यांनी भूम पोलीस ठाणे या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. या प्रकरणी भुम पोलीसांकडून एकुण सात जणांवर कलम 306 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी हे करीत आहेत एकुण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये -तीन महिलांचा समावेश आहे.


 
Top