भूम (प्रतिनिधी)- शहरातील गुरुदेव हायस्कूलच्या शाळेच्या मैदानात विद्युत प्रवाह सुरु असलेले विजेचे खांब उभे असल्याने विद्यार्थ्यांना या पासुन धोका होऊ शकतो. यामुळे सदरिल विद्युत वाहत असलेलेले खांब काढण्यात यावे अशी मागणी युवासेना भूम परांडा वाशी विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे यांनी कार्यकारी आभियंता रोहित जोगदंड धाराशिव यांच्याकडे केली आहे.

गुरुदेव दत्त हायस्कुल भूममध्ये शिकत असलेल्या विध्यार्थ्यांच्या जिवीतास धोका होऊ शकतो. म्हणून शाळेतील पालकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे खांब काढण्याची विनंती केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकारी अभियंता धाराशिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे लेखी पत्रान्वये आदेश दिला आहे. शहरामध्ये आलमप्रभू  मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत गुरुदेव हायस्कूलची शाळा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या एक हजारवर असून, या ठिकाणी शाळेचे ग्राऊण्ड प्रशस्त आणि मोठे असल्याने शाळेच्या मैदानामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी खेळ खेळतात. राजकिय, सामाजिक, क्रिडा इतर कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. या मैदानामध्ये विद्युत वितरण कंपनीची थ्री फेज आणि सिंगल फेजची हाय पावरची लाईन गेलेली आहे. संदर्भात अनेक वेळा हायस्कूल व पालकांनी संबंधीत विभागाकडे विद्युत प्रवाह होत असलेले उभे खांब ग्राऊण्ड मधून काढण्यात यावे अशी मागणी केली आहे.


 
Top