नळदुर्ग (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने नवीन 49 तालुके निर्मिती करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे.या समितीकडे नळदुर्ग शहर मनसेने अभ्यासपुर्ण तयार केलेला अहवाल पाठविला आहे.

ही समिती महाराष्ट्रात नवीन तालुके निर्मिती करणार असुन तसा अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.या पुर्वी अनेक वेळा अशा समिती स्थापन झाल्या व त्या समितीनी नळदुर्गला भेट देऊन तालुका निर्मितीसाठी नळदुर्ग हे सोयीस्कर ठिकाण असल्याचे अहवाल दिले होते,परंतु प्रत्येक वेळी नळदुर्ग वर अन्याय होऊन मागणी नसलेले अनेक तालुके झाले मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे नळदुर्ग हा तालुका झाला नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या अनेक वर्षांपासुन नळदुर्ग तालुका व्हाया यासाठी प्रयत्न करत आहे.यापुर्वी ठाकरे सरकारकडे 21 पानी अहवाल सादर केला होता.अनेकदा निवेदने दिली,प्रसंगी मोर्चा काढला,आंदोलने केली,आता कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन झाली आहे,ती समिती नळदुर्गच्या बाबतीत सकारात्मक राहावी व तालुका होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी या समितीकडे मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी तयार केलेला सुधारीत 25 पानी अहवाल पाठविला आहे.या अहवालात निवेदन,संकल्पित नळदुर्ग तालुक्याचा नकाशा,प्राथमिक माहिती,ऐतिहासिक पार्श्वभुमी,प्रसिद्ध देवस्थाने,भौगोलिक क्षेत्रफळ,लोकसंख्या,सोयी-सुविधा,सुविधेचा अभाव,उद्योगधंदे,दळणवळण,एकुण नगरपरीषदा,एकुण ग्रामपंचायत,विविध समितीची माहिती,कार्यालयासाठी उपलब्ध इमारती व जागा,अहवालात समाविष्ट आहे.याबाबत प्रमोद कुलकर्णी यांनी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करून अधिका-यांशी चर्चा केली आहे.अहवालातील दिलेल्या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,विधानसभा अध्यक्ष मयुर गाढवे,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे तालुकाध्यक्ष सुरज चव्हाण,तालुका उपाध्यक्ष गणेश बिराजदार,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,जनहित कक्षाचे ऍड.मतीन बाडेवाले,शहर संघटक रवि राठोड,मनविसे शहराध्यक्ष निखिल येडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्रात नवीन तालुक्याची निर्मिती होणार असल्याने नळदुर्ग शहरवासियांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत,तालुका होण्यासाठी मनसे मैदानात उतरली असुन नागरीकांनीही मनसेच्या पदाधिका-यांना पाठिंबा दिला पाहिजे.


 
Top