नळदुर्ग (प्रतिनिधी)- मागील वर्षी युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि. सोलापूरच्या वतीने नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 151 पुतळे वाटप केले होते. तर यावर्षी युनिटी मल्टीकॉन्सच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी “तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा“ आणि “चित्रकला स्पर्धा“ चे आयोजन करण्यात आले आहे. 

युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी,संचालक जयधवल करकमकर आणि संचालिका  वैशालीताई जैन यांच्या संकल्पनेतुन यावर्षी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.7 वी ते 10 वी या वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकतील.

नळदुर्ग येथील आंबाबाई मंदिर सभागृह येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे. यावेळी युनिटीच्या वतीने आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. निबंध स्पर्धेचा विषय -छत्रपती शिवाजी महाराज - जाणता राजा.आणि चित्रकला स्पर्धेचा विषय 1) छत्रपती शिवाजी महाराज 2)महाराष्ट्रातील गडकिल्ले. निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या दोन्ही स्पर्धेसाठी अनुकमे बक्षीस प्रथम नंबर 2500 रु. रोख आणि शिल्ड.  द्वितीय नंबर 2100 रु. आणि शिल्ड.  तुतीय नंबर 1500 रु. आणि शिल्ड,  चौथे नंबर 1100  रु. आणि शिल्ड,  पाचवे नंबर 750 रु. आणि शिल्डअसे बक्षीस ठेवन्याय आले आहेत.

 दि. 10 फेब्रुवारी वार  शनिवारी रोजी सकाळी 10 वा. ही स्पर्धा सुरु होणार आहे. यावेळी होणाऱ्या उदघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्रीमती.एम.एम.इमानदार या राहणार आहेत. तर उद्घाटन नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार विलास येडगे, नळदुर्ग पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार प्रा.पांडुरंग पोळे,शिवाजी नाईक, नळदुर्ग विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, खुदावाडी विकास सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे, नळदुर्ग ब्राह्मण समाज संघटनेचे सचिव मुकुंद नाईक उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त शाळेने या स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन कफिल मौलवी,जयधवलं करकमकर आणि वैशालीताई जैन यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन नळदुर्ग किल्याचे युनिटीचे व्यवस्थाक जुबेर काझी आणि युनिटीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी हे करीत आहेत.


 
Top