धाराशिव (प्रतिनिधी)-मराठीच्या शिक्षकांनी व्याकरणाचे अध्यापन जबाबदारीने व प्रभावीपणे करावे. भाषेत नवीन झालेले बदल स्वीकारून शिकवावे. मराठीचे शिक्षक मितभाषी असतात .शिक्षकांनी प्रामाणिक ,निर्व्यसनी , चारित्र्यसंपन्न राहावे असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक मतदारसंघ  संभाजी नगरचे आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले.

ते तेरणा साखर कारखाना प्रशाला तेरणानगर येथील मराठीचे सहशिक्षक भागवत घेवारे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ सोहळ्यात धाराशिव येथील जत्रा हॉटेल सभागृहात दिनांक 4फेब्रुवारी 2024 रोजी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत सहशिक्षक सुधाकर उंबरे होते. 

यावेळी सुधाकर उंबरे, संदिपान कुंभार, नितीन तावडे, जयराम कुंभार, अनंत घेवारे, कविता पुदाले आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करून दीप प्रज्वलन केले. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ व मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिव च्या वतीने भागवत घेवारे यांचा शाल ,बुके व मानपत्र देऊन सत्कार केला. बहिणींनी औक्षण केलेे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नेते बालाजी तांबे यांनी तर सूत्रसंचालन अमोल तावसकर यांनी केले. मानपत्राचे वाचन शिक्षक नेते राजकुमार मेंढेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धलिंग तावसकर, तुकाराम घेवारे, विजय तोडकरी, शिवकुमार चाकुरे, पूजा घेवारे, अश्विनी झाडे, सुलक्षना तावस्कर, शीतल तावसकर, रमा घेवारे, संजीवनी गवसने  आदींनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थिताचे आभार शुभम घेवारे यांनी मानले.


 
Top