धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श परिवार धाराशिव आयोजित मकर संक्रांत महोत्सव 2024  हा सोहळा दिनांक 03 फेब्रुवारी 2024 शनिवारी सायंकाळी संपन्न झाला.या कार्यक्रमात मिसेस धाराशिव हा मनाचा किताब प्रतीक्षा ऋषिकेश शिंदे यांनी पटकावला. 7001 रुपये रोख बक्षीस, मनाचा मुकुट, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रथम विजेत्या मीरा भगवान गोरोळे ठरल्या. रोख 5001 रुपयेचे बक्षीस पटकावले. तर, द्वितीय विजेता श्रुती मयूर गायकवाड 2501 रुपये रोख बक्षीस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस तथा माजी नगरसेविका प्रेमाताई सुधीर पाटील, मंजुलाताई आदित्य पाटील, सौ. सुषमाताई देशमुख, उर्मिलाताई साहेबराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

दैनंदिन कामात व्यस्त असणाऱ्या महिलांना तणामुक्त आणि आनंदित करण्यासाठी उखाणे घेण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सहभागी सर्व स्पर्धकांना व विजेत्यांना भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यासाठी परीक्षक म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव सदस्य नृत्य कलावंत कमल सागर चव्हाण,.संगीता पाटील, भाग्यश्री निंबाळकर, आदिशक्ती नृत्यकला अकॅडमीचे शुभम खोत यांनी सहकार्य केले. यावेळी  संयोगीता राजेनिंबाळकर, शुभांगी कैलास पाटील, महिमा अतुल कुलकर्णी, आयकर अधिकारी नितिका कॉवत या उपस्थित होत्या.

आदर्श परिवाराने यंदाच्या वर्षीपासून आदर्श माता पुरस्कार

कर्तुत्वान महिलांचा सन्मान करणारा पुरस्कार सरोजा बदोले यांना प्रदान करण्यात आला. कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपल्या मुलाला भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदापर्यंत निवड करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. 



 
Top