तुळजापूर (प्रतिनिधी) -घाटशिळ वाहनतळात झालेल्या मारहाण घटनेमुळे तिर्थक्षेञ तुळजापूर व पुजारी वृदांची बदनामी झाली असल्याने मंदिर सह शहरातील अनाधिकृत बोगस पुजाऱ्यांनावर प्रशासनाने कारवाई करुन यांचा बंदोबस्त करण्याची मागणी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे कि दि. 07 फेब्रुवारी 2024 रोजी घाटशीळ पार्कींग येथे भक्तांशी झालेली गैरवर्तणुकीची घटना निंदणीय आहे. देशभरातुन कोट्यावधी भाविक खाजगी वाहनतुन येतात. ते ज्या घाटशिळ वाहनतळात उतरताच सदर पार्कींगचे ठिकाणी मोठया प्रमाणावर पुजारी नसलेले अनाधिकृत व्यक्ती थांबून भाविकांची पुजारी आहे असे सांगुन दिशाभूल करतात. येथे थांबणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर वेळोवेळी कायदेशीर कारवाई करावी. या कार्यवाहीसाठी आपण सदर पाकींगचे ठिकाणी पुजारी म्हणून थांबणारे इसमांकडे मंदिर संस्थानने दिलेले पुजारी ओळखपत्र असल्याबाबत खात्री करावी व ज्याच्याकडे सदर ओळखपत्र नसेल अशावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी दिले.