तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवजयंती पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूर येथील गोलाई चौकात गोलाई ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य भगवा धव्ज अनावरण सोहळा शनिवार दि. 10 फेब्रुवारी रोजी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. 

यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले कि, छञपती शिवाजी महाराज जयंती पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्वजातीधर्माचे जीर्ण झालेले फाटलेले रंग उडालेले ध्वज बदलण्याचा संकल्प करुन ते बदला असे आवाहन केले. जीर्ण खराब ध्वज बदलविणे ही समाज सेवा ठरणार आहे असे यावेळी ते म्हणाले. यावेळी नितीन काळे, सचिन रोचकरी, सज्जन सांळुके, आनंद कंदले, शांताराम पेंदे, नरेश अमृतराव, दिनेश बागल, आबा रोचकरी, शिवाजी बोदले सह गोलाई शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top