धाराशिव (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'गाव चलो अभियान' या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि. 9 फेब्रुवारी रोजी ढोकी येथे अभियान यशस्वी करण्याकरता बैठक संपन्न झाली. या बैठकीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख श्री नितीन काळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्व क्षेत्रात केलेले कार्य हे सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केलेले आहे म्हणून देशाच्या विकासाची घोडदौड चालू आहे. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी व घरोघरी जाऊन या सर्व योजनांची इत्यंभूत माहिती जनतेला मिळत असल्याने हे अभियान यशस्वी होत आहे.

तसेच या दरम्यान ढोकी येथे वॉल पेंटिंग मोहिमेत भिंतीवरती कमळ चिन्ह रेखाटले. या अभियानांतर्गत शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशीही तसेच युवक, व्यावसायिक, महिला बचत गटातील अनेक सदस्य, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आदींशी भेटी घेवून संवाद साधला. यावेळी राजाभाऊ पाटील,अनंतराव देशमुख, सतीश देशमुख, बारिश साहेब  काझी, दत्तात्रय देऊळकर, निहाल काझी, झुंबर बोडके, मच्छिंद्र रसाळ, भारत जमदाडे, प्रभाकर गाढवे, इजाज काझी, बिलास रसाळ, गुणवंत सुतार, सिराज मुल्ला, अरुण कोकाटे, किशोर तिवारी, विकी लंगडे, बालाजी लंगडे, शहाजी कांबळे, अंकुश जाधव, संजय काळे, पवन वाघमोडे, शशिकांत देशमुख, शिवशंकर सुरवसे आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.


 
Top