भूम (प्रतिनिधी)-डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा पास होऊन रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थिनीची इंटरव्ह्यूसाठी व प्रोजेक्ट सादरीकरणासाठी संजना अमोल बळे यांची निवड झाली आहे.

संजना अमोल बळे या विद्यार्थिनीने लेखी परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा पूर्ण करून इंटरव्ह्यूसाठी व प्रोजेक्ट सादरीकरणासाठी 17 मार्चला मुंबई येथे जात आहे. त्याबद्दल तिचे व विज्ञान विषयाचे मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करून, अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थीनीस पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक गाडे, उपमुख्याध्यापिका पाटील, पर्यवेक्षक लगाडे, पवार, लोकरे, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक देशमुख, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top