उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील बलसुर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेच्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बुकनवाडी येथील सतीश दगडू नागलबोने छत्रपती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव यांना व इतर शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे तर बीएड श्रमजीवी अध्यापक विद्यालय उमरगा येथे झाले आहे. पहिली नियुक्ती वसंतराव नाईक विद्यालय वडजी तालुका जिल्हा धाराशिव येथे झाली. सध्या 2016 पासून ते छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथे कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ञ एमडी देशमुख होते. आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा, कमलाकरराव भोसले, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे जिल्हाध्यक्ष कुलकर्णी, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, शामराव कराळे, लालासाहेब पाटील, सुनील पुजारी, प्राचार्य श्रीपाद कुलकर्णी, डॉ. पाटील, श्रीहरी जाधव, सुदर्शन शिंदे, डॉ. बांगडा, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


 
Top