भूम (प्रतिनिधी)-भारत निवडणूक आयोगाकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तुतारी हे चिन्ह दिल्याचा तुतारी वाजवून भूम शहरातील ओंकार चौकात जल्लोष करण्यात आला. आज भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून पेढे भरून व तुतारी वाजून आनंद व्यक्त करण्यात आला. 

तुतारी हे चिन्ह शरदचंद्र पवार गटाला मिळाल्याने व सदरचे चिन्ह हे प्रत्यक्षरीत्या शहरवासीयांना पाहण्यास मिळाल्याने एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाने आगामी निवडणुकीचे रणसिंग फुंकले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंतराव पाटोळे, माजी नगराध्यक्ष गौरीशंकर साठे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गाढवे, डीसीसी बँकेचे संचालक संजय पाटील, शहराध्यक्ष रमेश मस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्याने प्रत्यक्ष तुतारीचा निनाद यावेळी शहरवासियांनी अनुभवला.


 
Top