भूम (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले.

एनआयएस कबड्डी प्रशिक्षक तथा शाळेचे संस्थापक संचालक अमर सुपेकर यांच्या हस्ते  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती.तर काही जणांनी मावळ्यांची वेशभूषा परिधान केल्या होत्या.  आरुष वरवडे, विधी असलकर यांनी शिवचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. तर कृष्णा बागडे याने शिवगर्जना केली. यावेळी उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. यावेळी प्राचार्या कल्याणी असलकर, मेघा सुपेकर, दिपीका टकले, चैताली टकले आदि उपस्थित होते तर आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम केले.


 
Top