भूम (प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ नळीवडगाव फाटा या वृद्धाश्रमाचे चालक गहिनीनाथ दगडु लोखंडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दि.18 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा. निधन झाले. ते छत्री दुरुस्त करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ नळी वडगाव फाटा या नावाने वृद्धाश्रम सुरु केले होते. स्वतःची पत्नी व कुटुंबासह ते आश्रमात राहत होते. त्यांनी आसपासच्या गावातील एक एक वृद्ध शोधुन वृद्धआश्रम सुरु केले. ते आश्रमातील वृद्धांचा मुलाने प्रमाणे सांभाळ करत. शासनाचे कसले ही अनुदान न घेता स्वतः भिक्षा मागून आश्रम चालवत. वृद्धाश्रम चालवताना महारांजांना अनेक अडचणींचा सामना केला. ते भिक्षा गोळा करून वृद्धाश्रमात 50 ते 60 लोकांचा सांभाळ करत होते. त्यांची सेवावृत्ती पाहून प्रशासकीय अधिकारी, राजकीय व्यक्ती व भूम परांडा वाशी मधील अनेक व्यापारी बांधवानी त्यांना आर्थिक मदत केली. प्रल्हाद अडागळे व पत्रकार शंकर खामकर यांनी त्यांना संस्था नोंदणीसाठी मदत केली.  त्यांच्या जाण्याने न भरणारी पोकळी निर्माण झाली असून वृद्धाश्रमातील वृद्धांचे छत्र हरवले असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परंडा विधानसभा प्रमुख प्रल्हाद अडागळे यांनी व्यक्त केले. त्यांचे पार्थिवावर नळीवडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top