परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील शासकीय विश्राम गृह येथे सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी डी.बी.ए.समूहाच्या वतीने 394 वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी डी.बी.ए समूहचे संस्थापक तथा अध्यक्ष  दयानंद बनसोडे, भारतीय बौद्ध महासभा बुद्धाचार्य दिलीप परिहार, व जिल्हा संघटक महावीर बनसोडे, मनोज सिंगनाथ, ॲड दयानंद धेडे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीबाई जाधव यांनी सामुदायिक  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर  दत्तात्रेय दगडू पाटील यांनी गीत गायले. ॲड दयानंद घेंडे, मनोज सिंगनाथ, दिलीप परिहार, महावीर बनसोडे, दयानंद बनसोडे, यांनी आपले विचार मांडले. यावेळी अमर गायकवाड,  प्रदीप परिहार, लहू काटवटे, युवराज कसबे, शिवाजी सोनवणे, रवींद्र शिंदे, महादेव चौधरी, नागेश थोरात, भीम शिंदे, संदिपान कांबळे, व महिला लक्ष्मीबाई जाधव, आरती बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे आदीसह महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले.


 
Top