उमरगा (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात स्वातंत्र्य पूर्व काळात शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. शिक्षण हे महत्वाचे क्षेत्र असून यावर होणारा खर्च ही भविष्यातील गुंतवणूक आहे. सुजाण नागरिक निर्माण करने हे शिक्षण संस्थेचे काम आहे.श्रमजीवी शिक्षण संस्थेने राज्याला दोन मंत्री दिले आहेत. या परिवारातील डॉ.दिलीप गरुड यांच्या रूपाने कुलगुरू पद मिळावे अशी संस्थेची अपेक्षा आहे. संस्थेने गुणी,शिक्षण प्रेमी व सकारात्मक विचार करणाऱ्या माणसाला ताकद दिली आहे. डॉ दिलीप गरुड यांची मध्यम उंची आहे मात्र कार्य कर्तृत्वातून खूप उंची वाढवली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काढले.

श्रमजीवी शिक्षण संस्थेच्या आदर्श वरीष्ठमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप गरुड यांच्या एकसष्टी निमित्ताने संस्थेच्या वतीने अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि 20) रोजी सायंकाळी घेण्यात आला या वेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ.भारतसिंह पवार,साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर,संस्थेचे चिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर,युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील,प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, संचालक शिवमूर्ती भांडेकर, मल्लिनाथ दंडगे,भाऊराव सोमवंशी, शिवराज दिंडीगावे, गोविंद पवार,बाजार समितीचे सभापती रणधीर पवार,माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, दिलीप भालेराव,प्रकाश आष्टे,विठ्ठलराव बदोले, बसवराज धाराशिवे,शिरीश उटगे, सचिन पाटील,डॉ कमलाकर कांबळे,अडँ विरसगप्पा आळंगे,आदींची उपस्थिती होती.  प्रारंभी डॉ.दिलीप गरुड यांचा संस्थेच्या वतीने मानपत्र देऊन व गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

या वेळी भारतसिंह पवार,शरण पाटील, रामकृष्णपंत खरोसेकर यांची भाषणे झाली. डॉ.दिलीप गरुड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की संस्थेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी मला केलेले सहकार्य या मुळे हे सर्व घडू शकले यात माझा कांहीच सहभाग नसून यांचे सर्व श्रेय संस्थेला सर्व कर्मचाऱ्याला व मित्रमंडळीला जाते असे ते म्हणाले.

डॉ प्रल्हाद लुलेकर म्हणाले की संस्थेने प्राचार्यांना जेवढे स्वातंत्र्य दिले तेवढी संस्था विकास पावत असते श्रमजीवी संस्था ही कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याच्या हेतूने स्थापन झाली या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी महाविद्यालय शिकवीत असते. विद्यार्थी शिक्षणास बाहेर पडला की त्याला काळ सांगत असतो तुझा मार्ग तुला शोधायचा आहे.बुद्धिजीवी माणसं संस्कृती निर्माण करतात पण कष्टकरी माणसं संस्कृती घडवत असतात.  औरंगाबादला त्या काळी मराठवाड्यात स्थापन झाले तेंव्हा मराठवाड्यात शिक्षणाचें प्रमाण चार टक्के होते त्यावेळी हिंदू स्त्रिया सुद्धा शिक्षणा बाबतीत बुरख्यात होत्या तेंव्हा स्वामी रामानंद तीर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संस्था काढल्या म्हणून आज समाज जिवंत आहे असे ते म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की मराठवाड्याचे 250 टीएमसी पाणी सरकार देतोच म्हणत आहे मात्र अजून ते आले नाही. सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिशी अमलात आणली मात्र बहुजनांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना नो एज्युकेशन झाले आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे भांडवल शाही वर्गाची मक्तेदारी झाली असून बहुजन आजही शिक्षणाच्या सुविधेपासून वंचितचं राहत आहे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रस्तावित उपप्राचार्य डॉ सुरेश कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन लक्ष्मण बिराजदार यांनी केले. तर प्राचार्य श्रीराम पेठकर यांनी आभार मानले. यावेळी सर्व विद्याशाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. कॉम्रेड अरुण रेणके, ॲड. दिलीप सगर, प्राचार्य गरुड सरांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top