धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी.औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली क्रीडा सप्ताह व वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश पाटील हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.इस्माईल मुल्ला (सिविल सर्जन, शासकीय रुग्णालय, धाराशिव), डॉ.सुरेश करंजकर (एम. एस.सुश्रुत हॉस्पिटल, धाराशिव), डॉ. दत्तात्रय खुणे (बालरोगतज्ज्ञ धाराशिव),डॉ.सुरज ननवरे (प्राचार्य, एस बी एन एम कॉलेज ऑफ फार्मसी धाराशिव), डॉ.शेख गाझी (प्राचार्य आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव) हे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलनाने वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी प्रास्ताविक पर भाषणामध्ये महाविद्यालयाचा वार्षिक गोषवारा सादर केला. सर्व उपस्थित पाहुण्यांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.                               विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, सामाजिक नाटके, फिल्मी गीत, गायन, समूह नृत्य ,लावणी यासारख्या विविध कला गुणांचे प्रदर्शन केले.तसेच क्रीडा सप्ताहामध्ये  खोखो, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, बुद्धिबळ, रस्सीखेच, धावणे, लिंबू चमचा, वेट लिफ्टिंग प्रश्नमंजुषा, पारंपारिक वेशभूषा, रील्स अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.या सर्व स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी येडे व मधुलक्ष्मी थोरात यांनी केले.आणि आभार प्रदर्शन प्रा. राम लोमटे यांनी केले.


 
Top