तुळजापूर (प्रतिनिधी) -येथील विठाई हॉस्पिटल तुळजापूर येथे शिवजयंती  निमित्ताने  सामाजिक दायित्वाच्या पार्श्वभूमीवर आजीमाजी सैनिक दिव्यांग एसटी कर्मचारी आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांना बिलात सवलत  देण्याचा एक अनोखा संकल्प घेण्यात आला.

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती विठाई हॉस्पिटल तुळजापूर येथे एक अनोखा संकल्प घेऊन साजरी करण्यात आली.विठाई हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ श्रीराम नरवडे (एमडी) यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सेवाभावातून आज पासून विठाई हॉस्पिटल येथे ऍडमिट होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी खालील सवलती जाहीर केल्या. आजी-माजी सैनिक 50 टक्के सवलत माजी एसटी कर्मचारी 20 टक्के सवलत. सेवेत असणारे एसटी कर्मचारी 20 टक्के सवलत दिव्यांग लोकांसाठी 20 टक्के सवलत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब 20 टक्के सवलत. तसेच गरजू रुग्णांना मोफत जेवण. प्रथम आई जगदंबा आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी शहरातील युवा नेते विनोद गंगणे,माजी नगरसेवक अमर मगर, पंडितराव जगदाळे, औदुंबर कदम, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले, सचिन अमृतराव, डॉ श्रीराम नरवडे, डॉ प्रशांत मोटे, डॉ विकास शिरसागर, प्रशांत संकपाळ, छगनराव जगताप, प्रवीण मुळे, पवन जगताप, गणेश खानवटे अझीझ सय्यद, साधू बोबडे, पराग जगताप, लालू शेख, तुळजापूर आगार प्रमुख राम शिंदे, एसटी कर्मचारी राजेंद्र जगताप,दत्तात्रय नरवडे,राम खराडे,विपिन नरवडे, दिव्यांग लोकांसाठी मदत करणारे महादेव चोपदार, मुळे व विठाई हॉस्पिटलचे सर्व स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top