धाराशिव (प्रतिनिधी)-बेंबळी जवळचे शिवाजीनगर या ठिकाणी असणारी वस्ती आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सहकार रत्न मराठवाडा भूषण अरविंद गोरे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी नगर या प्रवेशद्वाराचेही आज रोजी उद्घाटन करण्यात आले. चौकामध्ये भगवा ध्वज अरविंद गोरे यांच्या शुभहस्ते फडकविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संचालक ॲड. निलेश बाराखडे पाटील, शंकर सुरवसे, सतीश मुंगळे, बाबा शेख, ज्ञानोबा निकम तसेच शिवाजीनगर गावातील सरपंच शाहू भोसले, सतिश शिवलकर, संदिप इंगळे, संतोष शिंदे, भिमराव इंगळे,  समस्त इंगळे परिवार व शिवाजीनगर गावातील लहान थोर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली.


 
Top