तेर (प्रतिनिधी)-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांमध्ये सार्थक नागेश खोटे तर मुलींमध्ये ईश्वरी शिवानंद चिवटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील मध्यवर्ती शिव जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के .बेंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी मधील मुला मुलींसाठी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेचे तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेमध्ये जवळपास 50 मुला मुलींनी सहभाग नोंदविला यामध्ये मुलांमध्ये सार्थक नागेश खोटे, सिध्दांत बाळासाहेब फंड , ध्रुव ज्ञानेश्वर उफाडे ,शिवम धनंजय माने, मुलींमध्ये ईश्वरी शिवानंद चिवटे, समृद्धी नितीन पांगरकर, क्रांती भाऊसाहेब चौगुले, अनुष्का आप्पासाहेब मारवटकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला. यावेळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे, बी .डी .कांबळे, एस.एस. बळवंतराव, एस .यु. गोडगे, समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब शेळके, उपाध्यक्ष रियाज कबीर, सचिव प्रथमेश राऊत, खजिनदार राम कोळी, कार्याध्यक्ष आबा देशमुख ,शोभायात्रा प्रमुख अभिजीत देशमुख, प्रेम राऊत यांनी परिश्रम घेतले.    


 
Top