तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्यादित मुंबईच्या संचालक पदावर श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मधुकरराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

या पुर्वी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्यादित मुंबई च्या चेअरमन संचालक पदावर माजी मंञी मधुकर चव्हाण होते. आता त्यांचे पुञ सुनिल चव्हाण संचालक  म्हणून बिनविरोध निवडुन आले आहेत. मराठवाड्यातून या पदासाठी दोन संचालक असून त्यापैकी एका पदावर सुनील चव्हाण यांची बिनविरोध निवड झालेली आहे. चव्हाण हे खंडोबा पणन सह. संस्थेचे चेअरमन असून जिल्हा बँकेचे संचालक आहेत. राज्यातील सहा विभागातुन प्रत्येकी दोन संचालक निवडले जातात यातुन चेअरमन, व्हा. चेअरमन निवडले जाणार आहेत. या पदासाठी मराठवाड्यातुन तीन जणांचे अर्ज आले होते. त्या पैकी एकाने आपला अर्ज मागे घेतल्याने सुनील चव्हाण व संभाजीनगरचे काळे यांची निवड झाली आहे. या निवडीचे तालुक्यात फटाके फोडुन, पेढे वाटुन स्वागत केले गेले.


 
Top