तुळजापूर (प्रतिनिधी)- बंगलोर येथील  अझीम प्रेमजी विद्यापीठात छञपती शिवाजी महाराज यांची जयंती. छञपती शिवाजी महाराज महाराजांचा जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप सर्व राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येवून साजरी करण्यात आले.

प्रथमता छञपती शिवाजी महाराज सह अन्य महामानवांचा प्रतिमेस फुले वाहून विद्यार्थ्यांनी छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले .त्यानंतर 

अझीम प्रेमजी विद्यापीठातील अर्थशास्त्राचे तज्ञ प्राध्यापक नीरज हटेकर यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अमुल्य  विचार सांगून त्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी सर्व उपस्थितीत विध्यार्थांना ? (शिवाजी कोण होता ?) या कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तक मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर (शिवाजी कोण होता ?) या कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तकातील एका धड्याचे वाचन करुन त्यावर विध्यार्थींची सविस्तर चर्चा संपन्न झाली. यावेळी देशातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी विद्यार्थिनी उपस्थितीत होते.


 
Top