कळंब (प्रतिनिधी)- वनस्पतीशास्त्र विभाग , शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब आणि सामाजिक वनीकरण विभाग कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने   विद्यार्थ्यांची 3 दिवसीय शैक्षणिक सहल जैव विविधतेने नटलेल्या दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती यांचे वर्गीकरण आणि अभ्यास करण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पास भेट दिली ,आपल्या विद्या शाखेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावल्या जाव्या आणि पर्यावरणसंबंधी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वनस्पतीशास्त्र विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांनी वर्षभरात अनेक उपक्रम राबविले आहेत .दिनांक 3 फेब्रुवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2024 यादरम्यान पेंच आणि  मेळघाट व्याघ्र प्रकल्पास भेट दिली येथील अभयारण्यमध्ये दोन दिवशीय वनस्पती वर्गीकरण कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेत प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेट ,निरीक्षण ,ओळख ,प्रश्न कृती ,अभ्यास ,चर्चा यावर भर देण्यात आला तसेच वन विभागातील श्री संतोष दोडके, श्री एस .आर .कुलकर्णी उशा जाधव यांनी वन्यजीवसरंक्षण , वनस्पतीचे महत्व ,पर्यावरण संरक्षण या विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील श्रीमती ए .आर मुखेडकर ,डॉ. श्रीकांत भोसले ,डॉ.विश्वजीत म्हस्के यांनी अनवृत्तबीज  वनस्पतीवर्गीकरण ,याबद्दल सखोल माहिती दिली. वनात भटकंती, निरीक्षण आणि अभ्यास ,जैव विविधतेने नटलेल्या अभयारण्यत विद्यार्थ्यांना ज्ञान ,आकलन ,अनुप्रयोग, विश्लेषण ,संश्लेषण आणि मूल्य मूल्यमापनावर बनलेल्या ब्लूम थेअरीनुसार  वनस्पतीचे वर्गीकरण कसे करावे आणि वर्गीकरणाची तत्वे  याबद्दल प्रात्यक्षिक मिळाले.विविध भागातून विद्यार्थ्यांनि वेगवेगळ्या पिकांवर पडलेल्या रोगांचा अभ्यास केला,यावेळी डॉ.संदीप महाजन ,सहायक ग्रंथपाल अरविंद शिंदे उपस्थित होते ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी चार भिंतीच्या आत तर ज्ञानार्जन होतेच पण त्यास प्रत्यक्ष कृतीची जोड लाभल्यास अधिक सखोल अभ्यास होतो त्यासाठी अश्या कार्यशाळेचे आयोजन महत्वाचे असते असे आवाहन केले ,या सहलीसाठी, हनुमंत जाधव,संतोष मोरे,जया पांचाळ,महादेव भारती यांनी  सहकार्य केले.


 
Top