तुळजापूर (प्रतिनिधी) - शिवजयंती पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यातील तीन शिवप्रेमी डाँक्टर व शिक्षक यांनी  निलंगा ते तुळजापूर असा 90 किलोमीटरचा सायकल प्रवास करीत तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन छञपती शिवाजी महाराज यांची वरदायनी असलेल्या  श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

रविवार दि 18रोजी निलंगा येथील छञपती शिवाजी महाराज पुतळ्यास पहाटे पाच वाजता पुष्पहार अर्पण करुन डॉ. ज्ञानेश्वर कदम, डॉ. शाहुराव माकणीकर, गणेश ऐखंडे यांनी सायकल वरुन सकाळी 9.30 वा तिर्थक्षेञ तुळजापूरात आगमन झाले. त्या नंतर थेट श्रीतुळजाभवानी मंदिरात जावुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन छञपतीशिवाजीमहाराज यांना अभिवादन केले. मागील पाच वर्षापासूनडॉ. ज्ञानेश्वर कदम आपल्या सहकार्यांसह शिवजयंती दिनी सायकल वरुन तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करीत आहे. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य पुजारी कुमार टोले यांनी केले.


 
Top