तुळजापूर (प्रतिनिधी) -शहरात बालशिवप्रैमींनी छञपती शिवाजी महाराज पुतळा पुजन करुन अभिवादन करुन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

बच्चे कंपनी सकाळ पासुन डोक्यावर भगवी टोपी, कपाळी भगव्या आरगज्याचे कुंकु लावुन शिवजयंती साजरी करण्यासाठी धडपडत होते. त्यांनी आपल्या घरातच छञपती शिवाजी महाराज प्रतिमा प्रतिष्ठापीत करुन पुजन करुन शिवजयंती साजरी केली. काहि बाल शिवप्रेमीनी तर छञपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर शिरा हजारो प्लेट वाटुन शिवजयंती साजरी केले.


 
Top