धाराशिव (प्रतिनिधी)- 50 हजार कोटीचा काश्मीर ते कन्याकुमारी हा उत्तरेकडून दक्षिनेला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबर पर्यंत पुर्ण होणार असुन तो राष्ट्रीय महामार्ग धाराशिवलाही जोडला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामासाठी सरकारने 220 कोटी म्हणून अधिकचा निधी मंजूर केला. त्यापैकी 122 कोटीच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आज धाराशिवमध्ये पार पडला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, निवृत्त आयएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा परिषदेचे सीईओ घोष, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सह मोठया संख्येने महिला व पुरूषांची उपस्थिती होती. 

केंद्रीय मंत्री गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, लातूर ते टेभूर्णी रस्त्याची मला ही वाईट वाटते तो रस्ता या आधी पुर्ण होणे गरजेचे होते. मात्र आता लवकरच हा रस्ता चार पदरी महामार्ग बनवण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. आपला भारत देश हा प्रगतिच्या दिशेने वाटचाल करतोय, आमच्या विदर्भापेक्षा तुमच्याकडे उसाचे उत्पन्न जास्त असुन बागायती जमीन सुध्दा जास्त आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची संख्या सुध्दा मराठवाडयात जास्त आहे. जणेकरून संगळे साखर कारखाने इथेनॉलची निर्मिती करू शकतात. मोठया प्रमाणात इथेनॉलची निर्मीती झाली तर अगदी शेतकरी आपली स्कुटर सुध्दा इथेनॉलवरती चालवेल. पेट्रोल डिझलच्या वाढलेल्या किमती आपोआप कमी होतील. यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे मत कार्यक्रमादरम्यान मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. 


आईची इच्छा पूर्ण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी केंद्रीय रस्ते विकास मंत्री झाल्यानंतर आईची एक इच्छा होती. मला म्हणाली, माहुरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता हा मार्ग होणे फार महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोट ते गागणापूर हा पण मार्ग होणे गरजेचे आहे. असे सांगून नितीन गडकरी यांनी सांगितले की, नागपूर ते रत्नागिरी हा मार्गा आता चारपदरी झाला असून, आईची इच्छा पूर्ण केली आहे. 


 
Top