परंडा (प्रतिनिधी) - येथील तहसील कार्यालयात आलेल्या युवकावर कुऱ्हाडीचे वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार दि.7 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोनारी येथील किरण पवार हे कामासाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यावेळी आरोपी दत्ता इटकर याने मागील भांडणाची कुरापत ठेऊन पुरवठा विभागाच्या कार्यालय समोर पवार यांच्यावर कुऱ्हाडीचे वार केले.या घटनेत किरण पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी दत्ता इटकर यास अटक करण्यात आली असून गुन्हयात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे.