परंडा (प्रतिनिधी)-आखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती धाराशिव साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त “जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024“ दि 04/02/2024 रोजी परंडा तालुक्यातील देवगांव (खु) येथील मुख्याध्यापक श्री. निर्मलकुमार मच्छिंद्र गांधले यांना मिळाल्याने कल्याणसागर समुहाचे अध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूरयांनी संवाद निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आला.

यावेळी कल्याणसागर मा. विद्यालय डोमगावचे मुख्याध्यापक श्री. सुबोधसिंह ठाकूर, मुख्याध्यापक  अनंत सुर्यवंशी, मुख्याध्यापक सुनिल पडघन, मुख्याध्यापक किरण गरड, मुख्याध्यापक रणजित घाडगे, चंद्रकांत पवार, संस्थेचे उपाध्यक्ष  हिमालय वाघमारे, अंगद लांडगे तसेच सिध्देश्वर विद्यालय देवगांव खु, कल्याणसागर मा. विद्यालय डोमगाव व परंडा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top