धाराशिव (प्रतिनिधी)- 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. त्यांना जन्मदिनी आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा गौरव दिवसच्या पुर्वसंध्येला नगरवाचनालय धाराशिव येथे रुपामाता फाऊंडेशन धाराशिव च्या वतीने कुसुमाग्रज लिखित काही दर्जेदार पुस्तके भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड अधिक वृंद्धींगत व्हावी वाचकांना प्रेरणा मिळावी व युवकांचे वाचनातून व्यक्तीमत्व घडवावे असा यामागे उद्देश असल्याचे रुपामाता फाऊंडेशनचे चे सचिव अँड.अजित व्यंकटराव गुंड यांनी सांगितले. यावेळी नगरवाचनालयाचे अध्यक्ष नितीन तावडे, समन्वयक गजानन पाटील, हर्शल मोहीते, ग्रंथपाल सुयोग जोशी,सहा.ग्रंथपाल विजय वाघमारे,निर्गम सहा.दिलावर शेख,लिपिक उषा पानढवळे,सहाय्यक याकुब पठाण, महानंदा माने व वाचक उपस्थित होते.


 
Top