धाराशिव (प्रतिनिधी)-अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर  केलेलं अंतरीम  बजेट हे महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा ,नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा व शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविणारा  अर्थहीन अर्थसंकल्प मांडणारे सरकार बरखास्त करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, गरीब, वंचित, उपेक्षित घटक देशोधडीला लागणार आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवावर अन्याय करणारा अर्थसंकल्प मांडला आहे. तसेच कृषी, उद्योग, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार, बांधकाम व्यवसाय या सर्व क्षेत्रावर वरवंटा फिरवणारा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या  अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनता, शेतकरी, तरुण, महिला, मागासवर्गीय यांच्यासाठी  कसलीही भरीव तरतूद नाही तसेच शेतकऱ्यांसाठी प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा एक शब्दही अर्थसंकल्पात उच्चारला नसून ही सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक कराणारा अर्थसंकल्प आहे.


 
Top