भूम (प्रतिनिधी)- आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हया मध्ये आनेक जण भावी खासदार म्हणून मोठ मोठे होर्डिंग लवून गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार आहेत. परंतु  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सर्व सामन्य लोकापर्यंत स्वतः संपर्क ठेवला आहे. सर्व सामान्याच्या हाकेला धावून जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर बोलतोय ! एकच कॉल प्रॉब्लेम स्वॉल अशा प्रकारचे स्टिकरचे धाराशिव लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे.

येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी,लोकसभेचे इच्छूक असलेले भूम परांडा वाशी विधान सभा मतदार संघामध्ये विरोधकाचे भावी खासदार म्हणून होर्डींग लागले असुन सदरिल कृत्य हस्यस्पद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे जनतेच्या अडीअडचणींना धावून येत आहेत. याच मुळे खासदार ओमराजे निंबाळकर बोलतोय एकच कॉल प्रॉब्लेम स्वाल आसे स्टिकर युवासेना भूम - परांडा -वाशी विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे यांनी काढले असुन ते प्रत्येक कार्यकर्त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर वाहनाला लावण्यात येत आहेत. 

सदरील खासदार ओमराजे निंबाळकर बोलतोय ! एकच कॉल प्रॉब्लेम स्वॉल या स्टिकरचे प्रकाशन धाराशिव लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर पाटील, धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा युवा सेना जिल्हाप्रमुख  डॉ. चेतन बोराडे, विधानसभा समन्वयक दिलीप शाळु महाराज, युवा सेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिनत सय्यद, तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे, उपतालुकाप्रमुख आब्दुल भाई सय्यद, रामभाऊ नाईकवाडी, शहरप्रमुख ॲड. प्रकाश आकरे, श्रीमंत भडके, अविनाश गटकळ, अशोक वनवे, विभाग प्रमुख लहू गोरे, विनोद रेडे, रफिक तांबोळी, प्रतिक रणदिवे, बाबुराव सपकाळ, संजय नायकिंदे, सोशल मीडिया मिनीनाथ नरके, जीवराज कुटे, संजय नायकिंदे ऋषी जाधवर, हर्षवर्धन जाधवर, इत्यादी प्रमुख पदाधिकारी हजर होते.


 
Top