धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी च्या वतीने कळंब येथील साई मंगल कार्यालय येथे गाव चलो अभियानांतर्गत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक प्रमुख नितिन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की गाव खेडी आपल्या वैभव संपन्न भारताचे ठेवी असून गाव खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गावागावात झालेली विकास कामे व इतर सर्व लोककल्याणकारी योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संवाद साधून हे गाव चलो अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांनी यावेळी केले.

2014 ते 2024 या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण देशाचे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर ही देशाचे नाव उंचावले आहे. मोदी सरकारला भाजपाशासित अनेक राज्य सरकारनेही उत्तम साथ देत आपापल्या राज्यात मोठा विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांचे यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार गाव चलो अभियान सुरू करण्यात आले असून 4 ते 11 फेब्रुवारी या काळात हे अभियान राबविण्यात येणार असल्याचेही नितीन काळे यांनी म्हटले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मकरंद पाटील, रामहरी शिंदे, अशोक भाऊ शिंदे, विकास बारकुल, सतपाल बनसोडे, विजेंद्र चव्हाण, संजय घोगरे, मिनाज शेख, माणिकराव बोंदर, दत्ता साळुंके, प्रणव चव्हाण, संतोष कस्पटे, आदीसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top