धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि उपकेंद्र धाराशिव यांच्या नामकरणाचे बोर्ड त्वरित लावण्यात यावेत यासह भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात संविधान जनजागृती पर कार्यक्रम व्याख्याने परिसंवाद उद्देशिका वाचन यासोबतच संविधान दिनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जावेत,धाराशिव येथील विद्यापीठ उपकेंद्र परिसरात अंतर्गत रस्त्यांसाठी आर्थिक तरतूद करावी तसेच उपकेंद्राला संरक्षक भिंत करण्यासाठी ही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी अशी मागणी विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री देविदास पाठक यांनी अर्थसंकल्पीय सिनेट बैठकीत केली.यावेळी या अर्थसंकल्पीय बैठकीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी प्राध्यापक डॉक्टर वाल्मीक सरवदे कुलसचिव श्री अमृतकर यांच्यासह सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य सिनेट सदस्य आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या अर्थसंकल्पीय आधी सभा बैठकीत सिनेट बैठकीत सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केंद्र आणि राज्य सरकारने छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नावाचे शासकीय परिपत्रक काढून त्याचे अंमलबजावणी झाली आहे विद्यापीठ स्तरावर मात्र त्याचे अद्यापही  अंमलबजावणी झाली नाही याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून विद्यापीठ आणि उपकेंद्र परिसराच्या  छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नामफलकाचे लवकरात लवकर काम करावे अशी मागणी यावेळी केली. 

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात उपकेंद्राच्या नियमित खर्चासाठी दोन कोटी 48 लाख रुपयांची तरतूद झाली असून विविध प्रकारच्या खरेदी बांधकाम तसेच विविध विकास कामांसाठी एक कोटी एकोणीस लाखांची तरतूद या अर्थसंकल्पात झाली आहे.यात प्रामुख्याने उप परिसरात क्रीडांगण विकसित करण्यासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या सोबतच कमवा आणि शिका योजना तसेच धाराशिव येथे मुलांचे वस्तीगृह, ज्ञान स्रोतकेंद्रांतर्गत विविध अभ्यासक्रमांची पुस्तक खरेदी, डेटाबेस सॉफ्टवेअर खरेदीसाठी भरीव निधीची तरतूद यात करण्यात आली आहे.


 
Top