तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील अनंत व्यास यांना सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने राज्यस्तरीय नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लातूर येथे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या हस्ते अनंत व्यास यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


 
Top