धाराशिव (प्रतिनिधी)-मुंबई, पुणे, नागपूर, अशा महानगरात अंमली पदार्थांची रॅकेट सक्रीयश असतात. मात्र आता धाराशिव सारख्या जिल्ह्यातही अंमली पदार्थांची विक्री होवू लागली आहे. अंमली पदार्थामुळे तरूणाईचे भवितव्य अंधाररकामय होवू नये, याकरिता शिवसेना ठाकरे युवासेनेच्यावतीने शहरातून अंमली पदार्थ विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा, तुळजापूर या भागात एमडी ड्रग्जचा शिरकाव झाला आहे. तरूण वर्ग या अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडला आहे. ड्रग्जच्या व्यसनामुळे अनेकांचे कुटुंब उध्दवस्त झाले असल्याने हे व्यसन तरूणाईसह समाजाला घातक होवू शकते. त्याचे आरोग्यावरही परिणामी होवू शकतात. अशा ड्रग्ज तस्करांचे पाळेमुळे शोधून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी युवासेनेच्यावतीने शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आर्य समाज मंदिर चौक, संत गाडेगबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शहरातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजे, अंमली पदार्थ विक्रेत्यावर कारवाई करा अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. या मोर्चात युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे, मनिषा वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. 
 
Top