भूम (प्रतिनिधी)- ज्या प्रकारे शासन रासायनिक खतांना हजारो कोटी रुपये अनुदान देऊन कमी दरात शेतकऱ्यांना पुरवठा करतात त्याच प्रकारे सेंद्रिय खताला म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, गोमूत्र फवारणी, बायोगॅस स्लरी इ. ला अनुदान द्यावे. जनावरांचे जिओ टॅगिंग करून त्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल. सेंद्रिय खतांचा वापर वाढला तर जमिनीची प्रत सुधारेल, पाणी प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे संरक्षण होईल, आंतरराष्ट्रीय बाजारात गुणवत्तापूर्ण शेतमाल निर्यात करता येईल, कॅन्सर सारखे महाभयंकर रोग टाळता येतील व गो हत्या थांबेल. प्रतिदिन मोठ्या जनावरांना 200 रुपये तर लहान जनावरांना 100 रुपये एवढे अनुदान देण्यात यावे. यासोबतच शेतीमालावरचा हमीभाव वाढवावा व पीकविमा कंपन्यांनी ज्या त्या हंगामात नुकसानीची वास्तविकता पडताळून त्यांना परतावा द्यावा या प्रमुख मागण्यासाठी यावेळी अमेय बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.


 
Top