धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलची माजी विदयार्थिनी  प्रतिक्षा राजकुमार बिराजदार यांची सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता या पदी नियुक्ती झाल्याबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्षा बिराजदार या भोसले हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी 2015 मध्ये त्या दहावीला होत्या. पुढे त्यांनी अभियंत्रिकीचे पदवीशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेतून हे यश संपादन केले. या सत्कारसमारंभी त्यांच्या आई, सौ. धावणे, सौ.एम.एस.पवार व पर्यवेक्षक वाय. के. इंगळे उपस्थित होते.


 
Top