भूम (प्रतिनिधी)-श्री गुरुदेव दत्त हायस्कूल व श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर भूम यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी हायस्कूलचेचे सह शिक्षक आबासाहेब ढगे यांचा हस्ते चंद्रशेखर व्यंकट रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव, पर्यवेक्षक सतीशराव देशमुख, विज्ञान शिक्षक संतोष राऊत, सूर्यकांत वाळजे व सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते. यानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच वैज्ञानिक रांगोळी काढल्या व विज्ञान दिन साजरा केला.


 
Top