तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील अपसिंगा येथे चालु असलेल्या जलजीवन कामातील पाईप लाईन टाकण्याचे काम नियमानुसार नसल्याचा आरोप ग्रामवासियांन मधुन केला जात आहे. सदरील टाकलेल्या पाईपलाईन च्या कामाची  जागेवर जावुन पाहणी करुन योग्य ती पुढील कारवाई करण्याची मागणी होत आहे. या कामाचा पध्दतीमुळे यंदाचा उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी उहातान्हात भटकंती करावी लागण्याची पाळी ग्रामस्थांनवर येत आहे. तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा काक्रंबा जलजीवन काम चालु झाल्या पासुन वादग्रस्त बनले असुन तरीही हे वादग्रस्त काम कुणाचा छञ छायाखाली  आशिर्वादाने चालु आहे असा सवाल ग्रामस्थांमधुन केला जात आहे. 

सध्या जलजीवन अंतर्गत पाईप लाईन टाकण्याचे काम चालु असुन ते नियमानुसार खोली वर टाकली जात नाही. तसेच सिमेंट रोडला चिकटुन भरपूर जागा उपलब्ध असताना चिटकुन  पाईपलाईन टाकणे काम चालू असुन यामुळे भविष्यात रस्ता वाढवला गेला तर यात सदरील पाईप लाईन रस्ता खाली जाणार आहे. तसेच काही ठिकाणी काम सांडपाणी गटार चेंबर मधुन पाईल लाईन टाकल्याचा आरोप होत आहे. एका ठिकाणी ग्रामस्थांनी विरोध करताच तेथील काम थांबवले आहे.

जलजीवनचा अंधाधुंद कारभार चालु असुन कसेही काम करीत असल्याने यांना कुणाची भिती कशी वाटत नाही असा सवाल ग्रामस्थांमधुन केला जात आहे. पाईप लाईन टाकताना कुठे गटारात, कुठे एकफुट, कुठे दोन फुट अशी टाकली जात आहे. या पार्श्वभूमीवर जलजीवन काम ग्रामस्थांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे असल्याने दर्जदार नियमानुसार करण्याची मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे.


 
Top