परंडा प्रतिनिधी - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील गणित विभागाचे प्राध्यापक वैभव राजाभाऊ नवले यांची शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सहशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी बुके व शाल देऊन सत्कार केला.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, गणित विभाग प्रमुख प्रा डॉ विद्याधर नलवडे, स्टाफ सेक्रेटरी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ प्रकाश सरवदे, प्रा डॉ सचिन चव्हाण, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ अतुल हुंबे ,प्रा डॉ गजेंद्र रंदील , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा अमर गोरे पाटील, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख, प्रा शंकर कुटे, प्रा सावंत, प्रा निशिगंधा देडगे, प्रा तब्बसुम शेख आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की सदर निवड ही पारदर्शक असल्याने या नियुक्तीसाठी प्राध्यापक नवले यांनी रात्रंदिवस अभ्यास करून यश निर्माण केले आहे .तेव्हा केवळ या नियुक्तीवरच न थांबता पुढील शिक्षण चालू ठेवावे व पुढील यशाच्या दिशेने वाटचाल करावी. सत्काराला उत्कर उत्तर देताना प्राध्यापक नवले यांनी सांगितले की मी रात्रंदिवस अभ्यास केला म्हणून या परिषद उत्तीर्ण झालो .मला गणिताचे विभाग प्रमुख डॉक्टर विद्याधर नलवडे  यांचे सतत मार्गदर्शन लाभले आहे मी आणखीन पुढे जोमाने अभ्यास करून पुढील दिशेने वाटचाल करेन शिक्षणातील उच्च पदवी पीएचडी यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचलन व प्रास्ताविक  सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी करून आभार मानले.


 
Top