भूम (प्रतिनिधी)-शुभकार्य व सामाजिक स्तरावरील कार्यासाठी विविध वस्तू भंडारकडील साहित्यसाठी हजारो रुपयांचा जो खर्च होतो तो खर्च किमान टळला जावा. या सामाजिक बांधिलकीतून आरोग्य भूमिपुत्र डॉ. राहुल घुले यांनी ही मंगल सेवा तीन तालुक्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यांची सामाजिक स्तरावरून कौतुक केले जात आहे.

सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी भूम परंडा वाशी या तीन तालुक्यात आजपर्यंत मोफत आरोग्य सेवा पुरवणारे भूमिपुत्र म्हणून ज्यानी आपली ओळख निर्माण केली आहे . त्याच डॉक्टर राहुल घुले यांनी शासकीय विश्रामगृह येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन एका अनोख्या सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपात मोफत मंगल सेवा सुरू करून गोरगरिबांना मोठा आधार देण्याचं काम केलं आहे . ही बाब निश्चितपणे गोरगरिबांना दिलासादायक बाब आहे .

भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले यांनी अनेक मोठमोठ्या रेल्वे स्थानकावर वनरुपी क्लिनिक सुरू केले आहे. या अनोख्या सेवेच्या माध्यमातून एक वेगळी प्रतिमा जनमानसात निर्माण केली आहे. यात डॉ . राहूल घुले यांनी भूम परंडा वाशी तालुक्यातील 200 रुग्णांची छोटी मोठी ऑपरेशन 100% मोफत केली आहेत. यापुढेही मोफत आरोग्य सेवा कायम राहणार आहे यात शंका नाही.

या मोफत सेवेशिवाय आणखी ते सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपातील छोटे-मोठे संकल्प राबवत आहेत. मंगल सेवा सुविधेचा जाहीर पत्रकार परिषदेतून केलेला संकल्प हा पैसेवाल्यांसाठी नव्हे तर शेतकरी आणि  गोरगरीब कुटुंबाला केंद्रबिंदू समजून मोफत मंगल सेवा सुरू केली आहे .  लवकरच ते वनरुपी क्लिनिक सेवा देखील या भागात सुरू करणार आहेत. वनरूपी क्लिनिकच्या माध्यमातून तपासणी फी 1 रुपया, लॅब तपासणी फी 10 रुपये, सलाईन फी फक्त 100 रुपये आकारली जाणार आहे.

मोफत मंगल सेवा सुविधा केंद्राच्या माध्यमातून वधु-वरांना बसण्यासाठी आकर्षक खुर्ची (राजराणी खुर्ची) संच, लग्नातील पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्च्या, जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी तसेच जेवण वाढण्यासाठी लागणारी भांडी, आसन पट्ट्या, चटई यासारख्या सुविधा कोणतेही भाडे न आकारता अगदी मोफत स्वरूपात देण्यात येणार असून आपले काम झाल्यानंतर या सर्व वस्तू कार्यालयात परत जमा करणे बंधनकारक राहणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन डॉ.राहुल भिमराव घुले यानी केले.


 
Top