धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांना समान वागणूक मिळायला हवी. आपल्या घरी आपण महिलांना सन्मान तसेच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दयायला हवे असे डॉ. साळुंखे व डॉ. जिंतूरकर यांनी नमूद केले. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिलांविषयक झालेल्या संशोधनाची आकडेवारी मांडून महिलांवरील अत्याचार तसेच मागासलेपण अधोरेखित केले.

राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर धाराशिव यांच्या वतीने खेड येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या सहाव्या दिवशी प्राचार्या तथा अध्यक्ष रोटरी क्लब, धाराशिव डॉ. अनार साळुंखे, व डॉ. मीना जिंतूरकर (प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ) सचिव रोटरी क्लब धाराशिव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मनीषा असोरे, विभाग प्रमुख शिक्षण शास्त्र विभाग विद्यापीठ उप-परिसर धाराशिव यांनी भूषविले. अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. असोरे यांनी नमूद केले कि, स्त्री पुरुष समानता हि एकमेकांशी भांडून नाही तर एकमेकांना समजुन घेवून निर्माण होईल. तसेच स्त्री पुरुष समानता हि काळाची गरज आहे, असे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कदम, पाहुण्यांचा परिचय वैष्णवी गलांडे यांनी, तर आभार सुदर्शन चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.



 
Top